वृक्षारोपण करुन दिला पर्यावरण प्रेमाचा संदेश
"निगूडशेत प्रिमियर लिग" च्या टिम्सचा कौतुकास्पद उपक्रम
तळा (विशेष प्रतिनिधी) :- तळा तालुक्यातील निगूडशेत गावातील ग्रामस्थ, युवक आणि महिलांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा आणि निसर्गावरील प्रेमाचा संदेश दिला आहे, तब्बल तीन किलो मीटर अंतर रस्त्याच्या दुतर्फा शेकडो झाडे लावून वृक्षारोपण केले. निगूडशेत गावातील "निगूडशेत प्रिमियर लिग" च्या टिम्सने आयोजित केलेला भव्य वृक्षारोपणाचा उपक्रम रविवारी पार पडला. गावातील आणि मुंबईतील असंख्य ग्रामस्थ, महिला, तरुणांनी हातात झाडे, पावडे, टिकाव घेऊन वृक्षारोपणाचा सोहळा साजरा केला. या वेळी शेकडो झाडांची लागवड करण्यात आली. लावलेली झाडे संवर्धन करून मोठी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यासाठी उपस्थित प्रत्येकाने झाड दत्तक घेण्याचा संकल्प केल्याचे सरपंच अनिता सरफळे आणि ग्रामपंचायत सदस्य रामदास मोरे यांनी सांगितले. दरम्यान संपूर्ण निगूडशेत गावातील आणि मुंबईकर ग्रामस्थ वृक्षरोपणात सहभागी झाल्याने सबंध तालुक्याला आगळा वेगळा संदेश मिळाल्याचे अधोरेखीत झाले. याप्रसंगी वृक्षारोपणासाठी पुढाकार घेण्याचे तरुणांनी केलेले प्रयत्न चांगलेच यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.
रस्त्याच्या दुतर्फा वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब व अन्य झाडे लावण्यात आली. वृक्षारोपण उपक्रमाला सरपंच अनिता सरफळे, ग्रामपंचायत सदस्य रामदास मोरे, महादेव सरफळे, नितेश सरफळे, जनार्दन सरफळे, दिपाली शिगवण, रोहिदास मंचेकर, कृष्णा शिगवण, अनिल सरफळे, रामदास मंचेकर, कृष्णा सरफळे, हरिश्चंद्र सरफळे, दत्तात्रय सरफळे, महादेव पाटील या मान्यवरांनी उपस्थिती लावली. मुंबईकर ग्रामस्थ नितीन महाडिक, हेमंत मंचेकर, संतोष सरफळे, जगदीश सरफळे, उमेश सरफळे, अमित मंचेकर, रमेश मंचेकर, ऋषिकेश शिगवण, समीर शिगवण, प्रवीण सरफळे, अजित मंचेकर, महेश मंचेकर, मंगेश पारावे, निलेश मंचेकर, जयेश सरफळे, गणेश मंचेकर,सोहम सकपाळ, धर्मेश मंचेकर, रोहन घुलघुले, योगेश मंचेकर, प्रकाश राणे, सुनील मंचेकर, प्रमोद वारगे, किरण पारावे, मनेश सरफळे, रोहित सरफळे, सोहम मोरे, मनेष सरफळे, प्रेम मंचेकर, प्रसाद सरफळे यांनी वृक्षारोपणासाठी विशेष मेहनत घेतली. ग्रामपंचायत सदस्य रामदास मोरे यांनी झाडे उपलब्ध करून दिली.