गोवंश हत्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करा!

माणगांव तालुका सकल हिंदू समाजाचे माणगांव तहसीलदारांना निवेदन


माणगांव (प्रमोद जाधव) :- माणगांव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात वाढत असलेले गोवंश हत्येचे प्रकार, गोवंश मांस वाहतूक व बेकादेशीररित्या विक्री यावर पूर्ण:त कडक निर्बंध लाऊन असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. महाराष्ट्र राज्याच्या गृह खात्याने याकडे विशेष लक्ष केंद्रित करावे. यासाठी माणगांव तालुका गो रक्षा गोसंवर्धन समितीचे अध्यक्ष तथा जनसेवा संघटना माणगांव चे संस्थापक अध्यक्ष ॲड. अनिकेत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव तालुक्यातील विविध हिंदू संघटना व गोवंशप्रेमी संघटना यांच्या माध्यमातून १९ जून रोजी माणगाव तहसीलदार विकास गारूडकर यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात रायगड जिल्ह्यात गोवंश हत्येचे प्रमाण गेल्या वर्षभरापासून वाढत चाललेले आहे.  गोवंशाची दिवसाढवळ्या कत्तल करीत आहे. पोलीस प्रशासनाला त्याविषयी पूर्व कल्पना, माहिती देऊनसुद्धा हत्या रोखण्यात अपयशी ठरत आहे. दिनांक १८ जून रोजी महाड जवळील इसाने कांबळे येथे गोरक्षक आणि आणि पोलीस प्रशासन यांच्यावर जमावाने हल्ला केला. त्यात चार गोरक्षकांना  पोलीसांच्या समोर मारहाण झालेली आहे.
पोलीसांनाही धक्का-बुक्की झालेली आहे. मागील काही प्रकरणात पोलीसांवरही हल्ला झालेला आहे, याबद्दलही पोलीसांकडून काहीही कारवाई होत नाही. पोलीस प्रशासन गोवंश हत्या थांबविण्यात सपशेल अपयशी ठरत आहे. सरकारने मुख्यतः गृह खात्याने यावर लक्ष दिले नाही तर गोवंश वाचवण्यासाठी हिंदू समाजाला रस्त्यावर उतरावे लागेल आणि त्यात पुढे जे काही घडेल त्याची पूर्णतः जबाबदारी सरकारवर असेल याची आपण नोंद घ्यावी, असा आशय नमूद करण्यात आला आहे.

माणगांव तहसीलदार यांना निवेदन सादर करतेवेळी माणगाव तालुका गो रक्षा गो संवर्धन समितीचे अध्यक्ष ॲड. अनिकेत ठाकूर यांच्या समवेत भाजप युवामोर्चा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष निलेश थोरे, निजामपूर विभागातून राष्ट्रवादी युवा नेते सागर खानविलकर, प्रदीप कदम, विशाल पाशीलकर, गोरेगाव विभागातून भाजप उ भा सेल अध्यक्ष आनंद राजभर, यु मो तालुका अध्यक्ष रितेश निवाते, भाजप रायगड लोकसभा विस्तारक रमेश ढेबे, संजोग मानकर, सचिन सत्वे, अल्पेश कापडेकर, ॲड. ज्ञानेश्वर मराठे, ॲड. लक्ष्मण शिंदे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे पदाधिकारी अनिकेत कांबळे,तसेच माणगांव तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मावळा प्रतिष्ठान, छावा प्रतिष्ठान, सकल मराठा समाज माणगाव तालुका तसेच विविध हिंदू धार्मिय संघटना व गो वंश प्रेमी संघटना तसेच सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते.

Popular posts from this blog