Posts

Image
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी  आधार व आवश्यक कागदपत्रे पडताळणी करुन घ्यावी रायगड (प्रतिनिधी) :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ 6 महिने ऐवजी 11 महिने करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी दि.10 मार्च 2025 किंवा त्यापूर्वी आपले सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणार्थींना उर्वरित पाच महिने कार्यप्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वाढीव 5 महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्य:स्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांनी आधार पडताळणी व आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार  यांनी केले आहे. कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या दि.09 जुलै 2024 अन्वये "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" सुरु करण्यात आली आहे.  या शासन निर्णय...